मुंबई: अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या सुप्रासिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली.प्राजक्ता तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती लंडनला गेली होती. प्राजक्ताला फिरण्याची खूप आवड आहे. नुकतीच ‘जागतिक पर्यटन दिनानिमित्त’ तिने एक इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. सध्या ती पोस्ट खूप चर्चेत आहे.
प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “देशभरातल्या विविध ठिकाणांचा video post केल्यावर लक्षात आलं, महाराष्ट्रातल्या ठिकाणांचाही video करायला हवा… त्याचा प्रवास तर फारच ह्रदयाजवळचा आहे… मी केवळ मराठी आहे म्हणून नाही तर “महाराष्ट्र” आहेच लय भारी:”.
पुढे तिने लिहिले की, माझं भाग्य की “मस्त महाराष्ट्र” कार्यक्रम, इतर अनेक शुटींग्स आणि इव्हेंट्सच्या निमित्तानं मला जवळपास सबंध महाराष्ट्र बघता, फिरता आला… (ह्या कार्यक्रमाचे episodes ZEE5 वर आहेत… ) जग फिरलो पण स्वतःचा भूभाग, संस्कृती माहिती नाही, अस झाल नाही. (अजूनही बरच बाकी आहे; आणि कितीही फिरल तरी हे वाटत राहणारच आहे, ते तसं वाटत रहायलाही हवय…)
प्राजक्ताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून ती रानबाजार या वेबसीरिजमुळे चांगलीच चर्चेत आली होती.
Eknath Shinde: ‘पीएफआय’वर भारतात बंदी! एकनाथ शिंदेनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…