
मुंबई : महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने (Avinash Sable) कॉमनवेल्थ गेम्समध्ये स्टीपचेस शर्यतीत रौप्यपदक मिळवून नवा राष्ट्रीय रेकॉर्डही सेट केला आहे. अविनाशने बर्मिंगहममध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत या शेतकरी पुत्राने भारताला रौप्य पदक मिळवून दिले आहे.
अविनाशने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 8:11:20 अशी वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकले आहे. याच्याआधी देखील अविनाशने अनेक पदके जिंकत विशेष कामगिरी केली आहे. पण यावेळी आपली सर्वोत्तम कामगिरी करत 8 मिनिटे 11.20 सेकंद घेत शर्यत जिंकल्यामुळे एक नॅशनल रेकॉर्ड मध्ये नोंद केली आहे.
प्रियंकानेही केली दमदार कामगिरी –
प्रियांका गोस्वामी हीने देखील 10 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक मिळवलं आहे. प्रियांकाने 43.38 मिनिटांत 10000 मीटर अर्थात 10 किमी अंतर पूर्ण केले त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या जेमिमाने 42.34 मिनिट वेळेत हे अंतर पूर्ण करत सुवर्णपदक मिळवलं.