
Rohit Pawar | कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार त्यांच्या कामामुळे कायम चर्चेत असतात. सर्वसामान्यांना मदत मिळावी यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत असतात. दरम्यान, रोहित पवार यांच्या मतदारसंघांमध्ये एमआयडीसी उभी राहावी यासाठी ते प्रचंड आग्रही आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये रोहित पवार यांनी एमआयडीसीसाठी आंदोलन देखील केलं होतं.
Nitin Desai Death । नितीन देसाई मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, अजित पवार यांचे आश्वासन
त्याचबरोबर त्यांनी एमआयडीसीसाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत देखील चर्चा केली आहे. एमआयडीसी उभी राहिल्यानंतर तरुणांना रोजगार निर्माण होईल असा रोहित पवार यांना विश्वास आहे. त्यामुळे रोहित पवार एमआयडीसी साठी आग्रही आहेत त्यावरूनच आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. (Rohit Pawar Vs Ram Shinde)
आज बोलताना रोहित पवार म्हणाले की, मी शाल घेऊन आलोय मी राम शिंदे यांचा सत्कार करणार आहे. कारण की तरुणांना काम मिळावे म्हणून एमआयडीसी उभारावी यासाठी मी प्रयत्न करत आहे तर राम शिंदे एमआयडीसी येऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यातील राजकारण चांगलेच तापले असल्याचे दिसत आहेत.
Crime News । धक्कादायक! बेदम मारहाण करत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचे चोरट्यांनी लुटले साडेचार लाख रुपये
रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये राजकारण तापण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधी देखील या दोघांनी एकमेकांना कायम विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आता आगामी काळात रोहित पवार यांच्या मतदार संघात एमआयडीसी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Crime News । महाराष्ट्र हदरला! अत्याचार करून चिमुकलीची हत्या