उन्हाळी सुट्ट्या म्हणजे भरपूर मज्जा, मस्ती आणि गंमत असे समीकरण आहे. सध्या सर्वत्र उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. सुट्टीमध्ये आपल्या मुलांना घेऊन बाहेरच्या देशात फिरायला जाण्याचा प्लॅन अनेक पालक करतात. यासाठी हॉलिडे पॅकेजचे ( Holiday Package) प्लॅन देखील पाहिले जातात. तुम्ही सुद्धा हॉलिडे पॅकेजचे प्लॅन पाहताय, तर सावधान ! कारण पुण्यामध्ये हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक ( Cheating) झाल्याचे समोर आले आहे. (Holiday Package | Fraud with the lure of a holiday package! Millions of losses to Punekars…)
Sara Ali Khan । सारा अली खानचा स्विमिंग पुलमधील ‘तो’ फोटो व्हायरल; फोटोमधील मुलगा नक्की आहे तरी कोण?
जेनियल इन्फो सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने तरुण – तरुणींना हाताशी घेऊन पुणे शहरातील विविध ठिकाणच्या नागरिकांकडून गिफ्ट कूपन ( Gift Coupens) भरून घेतले. विविध मॉल्स, डी-मार्ट आणि पेट्रोल पंपाजवळ असे कूपन्स भरून घेतले जात होते. त्यानंतर तुम्हाला गिफ्ट लागले आहे, असे सांगून नागरिकांना कंपनीच्या कार्यालयात बोलविण्यात आले. याठिकाणी त्यांना एक छानसे गिफ्ट दिले.
इथेच लोकांना हॉलिडे पॅकेजचं आमिष दाखवण्यात आले. सुट्टीला परदेशात जाण्याआधी ४५ दिवस आधी बुकिंग करा असे या लोकांना सांगण्यात आले. मात्र लाखो रुपये भरून लोकांनी ज्यावेळी बुकिंग केले तेव्हा त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे पुण्यातील नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. आपल्यासोबत असा प्रकार होऊ नये, यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
Anil Dujana | मोठी बातमी! उत्तरप्रदेशमध्ये आणखी एका गँगस्टरचा इन्काऊंटर; जागीच झाला ठार