होंडा (Honda) हा गाड्यांसाठीचा एक विश्वसनिय ब्रँड ( Trusted Brand) समजला जातो. अनेक ग्राहक आवर्जून या कंपनीच्या गाड्या घेतात. दरम्यान सरकारच्या नवीन उत्सर्जन नियमांमुळे होंडा कंपनीने त्यांची भारतातील सर्व डिझेल मॉडेल्स बंद केली. त्यानंतर आता खूप मोठ्या कालावधीनंतर होंडाकडून भारतीय बाजारपेठेत नवीन एसयूव्ही लाँच करण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही गाडी लाँच होण्यापूर्वीच बाजारात हिची प्रचंड चर्चा असून लोकांनी गाडी बुक करण्यास सुरुवात देखील सुरुवात केली आहे. (New Car of Honda company)
भारतासाठी अभिमानाचा क्षण! पुन्हा एकदा नीरज चोप्रा जागतिक भालाफेकपट्टू स्पर्धेत अव्वल
होंडा कंपनीच्या या नव्या गाडीचे नाव होंडा एलिव्हेट (Honda Elevate) असे आहे. येत्या सहा जूनला ही एसयूव्ही भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. सध्या होंडा डीलरशिप असणाऱ्या लोकांकडे या एलिव्हेटचं बुकिंग ११ हजार ते २१ हजार रुपयांपर्यंतची टोकन रक्कम घेऊन घेतले जात आहे. हुंडाई क्रेटा, मारुती ग्रँड व्हिटारा, टोयोटा अर्बन क्रुझर, टाटा हॅरियर आणि किया सेल्टोस या कारशी ही गाडी स्पर्धा करणार आहे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत ११ ते १२ लाख रुपये असणार आहे.
लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर सलमान खान सहित होते ‘हे’ १० जण, गँगस्टरचा कबुलीनामा वाचून बसेल धक्का
होंडा एलिव्हेटची वैशिष्ट्ये
१) यामध्ये होंडा सिटीचे १.५ लिटर पेट्रोल-हायब्रीड इंजिन असणार आहे.
२) ही गाडी फ्रंट व्हील ड्राइव्ह (FWD) प्रणालीमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
३)या गाडीमध्ये सिंगल-पेन सनरूफ असणार आहे.
४) यामध्ये वायरलेस कनेक्टिव्हिटी, अॅम्बियन्स लायटिंग, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, वायरलेस चार्जिंग, व्हॉईस असिस्टंट सपोर्ट या अत्याधुनिक सोयी असतील.
३)डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, लार्ज इन्फोटेनमेंट डिस्प्ले, रिअर एसी व्हेंट्स आणि प्रीमियम ऑडिओ सिस्टम यांसारख्या युनिक फीचर्स मध्ये ही गाडी असेल.
मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडू यांची मिश्किल प्रतिक्रिया; म्हणाले, “जेवल्याशिवाय आमंत्रण…”