प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंग (Honey Singh) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा असून तो करोडो लोकांच्या मनावर राज्य करत आहे. हनी सिंग आज आपला ४०वा वाढदिवस साजरा करत आहे. हनी सिंगनं आपल्या गाण्याच्या हटके स्टाइल स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे चाहत्यांना देखील त्याच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती जाणून घेण्यास नेहमीच उत्सुकता असते.
नेमकी काय आहे जुनी पेन्शन योजना? जाणून घ्या याबद्दल सविस्तर
हनी सिंग अनेक मुलाखतीमध्ये तो त्याच्या खासगी जीवनावर देखील भाष्य करत असतो. त्यामुळे तो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. त्याला एका मुलाखतीमध्ये गाड्यांच्या प्रेमाबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्याने सांगितले की, आता गाड्यांचा शौक राहिलेला नाही.
बिग ब्रेकिंग! अहमदनगरमध्ये H3N2 चा पहिला रुग्ण दगावला, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं
त्याचबरोबर हनी सिंगने पुढे सांगितले की, ज्यावेळी त्याने ऑडी आर ८ ही गाडी खरेदी केली होती त्यावेळी त्याने त्या गाडीच्या स्पेशल नंबर प्लेटसाठी तब्बल २८ लाख रुपये खर्च केले होते. या गाडीचा नंबर आर ८ हा होता त्यामुळे माझ्यासाठी हा नंबर खास असून मी यासाठी तब्बल २८ लाख रुपये खर्च केले होते. असं तो यावेळी म्हणाला आहे.
सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई कडून धमकी; “त्या प्रकरणी माफी मागावी अन्यथा…”