Accident News । सध्या अपघाताचे (Accident) प्रमाण खूप वाढले आहे. अनेकदा हे अपघात चालकाच्या चुकीमुळे होतात. यात अनेकांचा जीव जातो. यामुळे अनेक संसार उध्वस्त होतात. सध्या असाच एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने हा अपघात (Bike Accident) झाला आहे. (Latest marathi news)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुळे सोलापूर (Bike Accident at Solapur) भागात राहणारे तिघे मित्र मध्यरात्री दीडच्या सुमारास आपल्या पल्सर गाडीवरुन घरी जात होते. यावेळी शहरातील महावीर चौकात त्यांची गाडी झाडावर आदळली. ही धडक इतकी भीषण होती की तिघेही मित्र गाडीवरुन लांब उडून पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यामुळे ते जागीच ठार झाले.
यातील एका मित्राचा वाढदिवस होता. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. सध्या त्या तिघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात आहेत. मृत तरुणांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकत आहेत. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Ind vs Eng । भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ स्टार खेळाडू संघाबाहेर