राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याठिकाणी आंबा, द्राक्ष, ड्रॅगन फ्रुट, ज्वारी या पिकांचे भयंकर नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. गारपीट होऊन 40 तास उलटून गेले तरी शेतात गारांचा खच तसाच आहे. यामुळे लवकरात लवकर सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
उष्माघात घेऊ शकतो जीव! वेळीच घ्या ‘अशी’ काळजी
धाराशिव (Dharashiv) मध्ये एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना खराब झालेली जमीन दुरुस्त करण्यासाठी परत एकदा पैसा खर्च करावा लागणार आहे. त्यातच मजुरीचे दर वाढल्याने मोठा आर्थिक फटका बसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले आहे. याठिकाणी सध्या पंचनामे करणे सुरू आहेत. काल करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये 2 हजार 571 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने सादर केला आहे.
गौतमी लग्नबंधनात अडकणार? म्हणाली, “आयुष्यात एक तरी पुरुष…”
धाराशिव जिल्ह्यात 7 ते 9 एप्रिल या काळात झालेल्या पावसामुळे जवळजवळ 71 गावांना फटका बसला आहे. यामध्ये एकूण 38 घरांची पडझड झाली असून 3 नागरिक जखमी झाले आहेत. यामुळे सरकारने ( Government Help) लवकरात लवकर या लोकांना मदत जाहीर करावी अशी मागणी जनमानसांतून करण्यात येत आहे.
रोहित पवारांनी ट्विटरवर सुरु केला प्रश्न उत्तरांचा नवीन ट्रेंड; तरुणीने विचारला खासगी प्रश्न