Maharani Lakshmibai Medical College Hospital Fire । उत्तर प्रदेशच्या झांसीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी रात्री 10.45 वाजता भीषण आग लागली. ही आग लहान मुलांच्या नवजात बालकांसाठी असलेल्या NICU (निओनॅटल इंटेन्सिव केअर यूनिट) विभागात लागली, ज्यात 30 मुलं होती. आगीमुळे 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 16 जण जखमी झाले आहेत. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Raosaheb Danve । ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर रावसाहेब दानवे यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्या मुलांना उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. झांसीचे कमिश्नर बिमल कुमार दुबे यांनी सांगितले की, अधिकतर मुलांना वाचवण्यात यश मिळालं आहे. मात्र, या भीषण आगीत काही बालकांच्या मृत्यूने स्थानिक समुदाय आणि त्यांच्या कुटुंबियांना धक्का दिला आहे. जिल्हाधिकारी अविनाश कुमार आणि वरिष्ठ पोलिस अधिक्षक सुधा सिंह यांनी घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेला दु:खद आणि ह्दयद्रावक असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा प्रशासनाला जखमी मुलांना तातडीने चांगले उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक झांसीमध्ये पोहोचले असून, त्यांनी सांगितले की, या घटनेचा तपास केला जात आहे. फेब्रुवारीमध्ये फायर सेफ्टी ऑडिट झालं होतं, मात्र यानंतरही आग लागली याबाबत चौकशी सुरू आहे.
Politics News । ब्रेकिंग! महिलांच्या खात्यात १ तारखेला तीन हजार रुपये येणार? बड्या नेत्याची घोषणा
घटनेत मृत झालेल्या मुलांच्या कुटुंबांना पाच लाख रुपये आणि जखमी मुलांच्या कुटुंबांना 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. 7 मृत अर्भकांची ओळख पटवण्यात आली आहे, तर इतर मृतांची ओळख पटवली जात आहे.
Sharad Pawar । शरद पवार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, राष्ट्रवादीला विधानसभेला मिळणार ‘इतक्या’ जागा