सध्या ग्रेटर नोएडामधून (Greater Noida) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिर्याणी आणण्यास उशिर केला म्हणून काही तरुणांनी हॉटेलच्या (Hotel) कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मोठी बातमी! ‘कसौटी जिंदगी की’ फेम सिद्धांत वीर सुर्यवंशीचं निधन; ४६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
याप्रकरणी कर्मचाऱ्याने तक्रार दिल्यामुळे पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. घटना अशी घडली की, तीन तरुण बिर्याणी (Biryani) खाण्यासाठी हॉटेलमध्ये गेले व ऑर्डर दिली. पण ऑर्डर (Order) यायला जरा उशीर झाला म्ह्णून तरुणांनी संतापून कर्मच्याला बेदम मारहाण केली. अशी माहिती सूत्रांनी दिली.
गुजरात निवडणुकीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता
या घटनेने आसपासच्या (around) परिसरात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस यंत्रणा (Police system) करत आहे.