Sanjay Raut । मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक करण्यात आली होती. तब्बल 17 महिन्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) त्यांना दिलासा मिळाला आहे. त्यांना जामीन मंजूर करण्यात आला असून त्यांना येत्या एक किंवा दोन दिवसात तुरुंगातून सोडले जाईल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. (Latest Marathi News)
यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “नवाब मलिकांना आता मोकळा श्वास घेता येईल, याचा मला आनंद आहे. एखाद्या मंत्र्याला 16 महिने तुरुंगात ठेवून त्यांचा छळ ज्या कायद्याने करण्यात येत आहे, तो देशद्रोहापेक्षाही खूप भयानक आहे. नवीन इंजेक्शन घेतल्यामुळे मलिक सुटले,” असा दावा राऊत यांनी केला आहे.
“काल केंद्र सरकारने ब्रिटिश कालीन कायदा रद्द केला आहे. परंतु देशद्रोहाच्या कायद्याला मागे टाकणारे कायदे वापरून राजकीय विरोधकांना गुंतवले जात आहेत. या सरकारला ज्यांचा भविष्यात त्रास होईल अशा राजकीय कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले जात आहे,” असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, मलिक यांना जामीन मिळताच चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर मलिक अजित पवार गटात जाणार की शरद पवार यांच्या गटात जाणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
Gadar 2 । बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ ची जादू, पहिल्याच दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला