Raj Thackeray: “…महाराष्ट्रातून निसटलाच कसा?” महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

"… How did you escape from Maharashtra?" Raj Thackeray's angry reaction over the project in Maharashtra going to Gujarat

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये होणार आहे. यामुळे विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका होते आहे. दरम्यान, आता राज ठाकरेंनी देखील यावर प्रतिक्रिया दिलीये. “प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलाय. तसेच हे लक्षणं महाराष्ट्रासाठी चांगले नाही, असे देखील राज ठाकरे म्हणाले आहेत.

खुशखबर! आता फक्त 750 रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलिंडर ; आजच करा बुकिंग

यासंदर्भात ट्विट करत राज ठाकरे म्हणाले की, फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. “ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलाय.

शेतकऱ्यांनो सावधान! लम्पी रोगानंतर शेतातही आला चायनीज व्हायरस, आख्खी पिकेच करावी लागतेय नष्ट

हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं. अस देखील राज ठाकरे म्हणाले.

Chandrakant Khaire: “मुख्यमंत्र्यांच्या भाषणात अजिबात दम नव्हता..”, चंद्रकांत खैरेंची एकनाथ शिंदेंवर पैठणच्या सभेवरून बोचरी टीका

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *