मुंबई : संजय राऊतांच्या (Sanjay Raut) नावाने आज ‘सामना’च्या रोखठोक सदरात राज्यपालांवर टीकास्र सोडण्यात आले आहे. यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी ‘ईडी’च्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. “भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेल्या संजय राऊत यांना कारागृहातून लेखनाची परवानगी कशी मिळते? ” असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्याचबरोबर पुढे अजून एक प्रश्न विचारण्यात आला. त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत? असं देखील विचारण्यात आले.
काय म्हणाले संदीप देशपांडे?
संदीप देशपांडे ट्विट करत म्हणाले, “आज सामना मध्ये संजय राऊत यांच रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की त्यांना जेल मधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत?
आज सामना मध्ये संजय राऊत यांच रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की त्यांना जेल मधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 7, 2022
यासंदर्भात माध्यमांसोबत बोलताना त्यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. “राऊतांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अटक असलेल्या आरोपीला कारागृहातून लेख लिहीण्याची परवानगी आहे का? कारण ते काही स्वातंत्र सैनिक नाहीत किंवा त्यांच्या नावाने दुसरं कोणी लेख लिहित आहेत का? कोणी डुप्लीकेट संजय राऊत तयार झाले आहेत का? असे प्रश्न सामान्य जनतेला पडत आहेत. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
‘रोखठोक’मध्ये राज्यपालांवर टीका –
“राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची अखेर माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राबाबत चुकीची विधाने केल्याबद्दल पंडित नेहरू व मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती. नेहरू व मोरारजी देसाई यांनी इतिहासातील चुकीच्या संदर्भाचा आधार घेत विधाने केली. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाचा आगडोंब उसळला. नेहरूसारख्या लोकप्रिय नेत्यालाही महाराष्ट्राची माफी मागावी लागली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कोणी खेळ केलाच तर मराठी माणूस उसळून बाहेर पडतो, हा इतिहास आहे”. असे राऊत म्हणाले.