
Farmer Loan । शेतकऱ्यांना शेती करत असताना अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक संकटांचा (Natural disasters) सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना गरजेपेक्षा जास्त पैशांची गरज पडते. अनेकदा शेतकऱ्यांकडे पैसे असतातच असे नाही. त्यामुळे ते कर्ज (Loan) घेतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर (Interest rate) वेगवेगळे असते. त्यामुळे शेतकरी कमी व्याज असणाऱ्या बँकांकडून कर्ज घेतात. अनेकांना एक एकर क्षेत्रावर किती कर्ज मिळते? असा प्रश्न पडतो. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. (Bank Loan)
Sajay Raut । संजय राऊत यांची नार्को टेस्ट करा; भाजपच्या ‘या’ नेत्याची आक्रमक मागणी
क्षेत्रानुसार कर्ज पद्धत
एक एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 30 हजारापर्यंत कर्ज दिले जाते. समजा शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असल्यास कमीत कमी 50 हजार रुपये आणि जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत कर्ज देण्यात येते. (KCC)
Share Market । जबरदस्त कमाई करायचीय? तर लगेचच करा ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक, पहा यादी
कर्जाचे स्वरूप
कर्जाचे स्वरूप हे शेतकऱ्यांचे उत्पन्न, त्याचे जमिनीचे क्षेत्रफळ आणि मागील वर्षीचे पीक यावर अवलंबून असते. किसान क्रेडिट कार्ड योजनेतुन शेतकऱ्यांना वार्षिक सात टक्के व्याज दराने कर्ज मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर वेळेत कर्ज फेडले तर त्याला सात टक्के व्याज दरात तीन टक्के सवलत देण्यात येते. (KCC Loan)
Ajit Pawar । भाजपचा अजित पवारांना मोठा धक्का! १५ दिवसांतच बदलला ‘तो’ निर्णय
असा करा ऑनलाईन अर्ज
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी बँकेच्या संकेतस्थळावर जावे लागणार आहे.
- केसीसी रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करून अर्ज करा.
- सर्वात शेवटी कागदपत्रे अपलोड करून अर्ज जमा करा.
- Agriculture News । शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन, प्रथम येणाऱ्यास 50 हजारांचे बक्षीस
असा करा ऑफलाइन अर्ज
- ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरकारी बँकेत जावे लागेल.
- त्यानंतर अचूक फॉर्म भरा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर सर्व कागदपत्रे त्याला जोडा.
- त्यानंतर फॉर्म आणि कागदपत्रे बँकेच्या अधिकाऱ्यांकडे जमा करा.
आवश्यक कागदपत्रे
किसान क्रेडिट कार्डसाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, जमिनीचा सातबारा आणि खाते उतारा गरजेचा आहे.
दरम्यान, बँकांच्या माध्यमातून दिले जाणारे पीक कर्ज वेळेवर शेतकऱ्यांना मिळत नाही. याचे व्याजदर देखील खूप जास्त असते. त्यामुळे तुम्ही केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकता. यामुळे तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळेल शिवाय वेळेत कर्ज उपलब्ध होईल.
Farmer News । मिरचीचं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा केविलवाणा प्रयत्न, चक्क बाटलीने पाजले पाणी