राज्यात बडोदे, खान्देश, नगर, नाशिक, पुणे, सातारा या भागात वाटाणा पिकाचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. वाटाणा हे पीक थंड हवामानात वाढते. त्यामुळे सरासरी तापमान १o° ते १८° से तापमानात या पिकाची चांगली वाढ होते. दरम्यान कडाक्याची थंडी व धुके यांमुळे पिकावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे योग्य वातावरण बघून या पिकाची लागवड करावी. कारण फुले येण्याच्या वेळेस उष्ण हवामान असल्यास शेंगांत बी भरत नसल्याने वाटाण्याची प्रत कमी होते.
लागवडीसाठी जमीन व पूर्वमशागत
वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी चांगल्या निच-याची ५.५ ते ६.७ सामू असलेली जमीन निवडावी. तसेच वाटाणा पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येत असले, तरी हलक्या जमिनीत पीक लवकर तयार होते. तसेच वाटाणा हे पीक चांगले उत्पादनशील पीक असल्याने त्यासाठी पूर्वमशागत योग्य रीतीने करून जमीन भुसभुशीत करावी. एवढच नाही तर पेरणीपूर्वी हेक्टरी २५ गाड्या शेणखत व पाणी द्यावे व वाफसा झाल्यावर पेरणी केल्यास उगवण चांगल्या प्रकारे होते. वाटाण्याचे पीक हे एकदल पिकानंतरच घ्यावे. याचा अर्थ असा की वाटाणा हे पीक वांगी, कांदा, टोमॅटो,बटाटा, कांदा अशा रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडणा-या पिकांनंतर घेऊ नये.
Eknath Shinde: “जो काही निर्णय होईल तो…” , निवडणूक आयोगाच्या सुनावणीबद्दल मुख्यमंत्री शिंदेंच भाष्य
वाटाण्याचे प्रकार
अ) बागायती किंवा भाजीचा वाटाणा (गार्डन पी)
ब) जिरायती किंवा कडधान्याचा वाटाणा (फिल्ड पी)
सुधारित जाती
1)अरकेल : वाटण्याच्या अरकेल जातीच्या शेंगा या आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असतात. तसेच या साधारणपणे 6 ते 7 सेंमी. लांबीच्या असतात. या वाटण्याच्या झाडांची उंची 35 ते 45 सेंमी असून 50 ते 55 दिवसांनी शेंगा काढणीस तयार होतात.
2)बोनव्हेला : बोनव्हेला जातीच्या वाटण्याच्या शेंगा या आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असून शेंगातील दाणे अत्यंत गोड असतात. झाडांची उंची मध्यम असून 46 दिवसांनी शेंगा काढणीस तयार होतात.
3) जवाहर – 1 : जवाहर जातीच्या शेंगा फिकट हिरव्या रंगाच्या असतात. तसच या शेंगा 6सेंमी. पर्यंत लांब असतात. लागवडीपासून 55 दिवसांत फुलावर येते व 90 दिवसांत शेंगा काढणीस सुरवात होते.
Mahesh Babu: मोठी बातमी! सुपरस्टार महेश बाबूच्या आईचे निधन; पहाटे ४ वाजता घेतला अखेरचा श्वास