घरच्या घरी सोप्या पद्धतीने मुरघास कसा तयार करावा? वाचा सविस्तर माहिती

How to prepare chicken easily at home? Read detailed information

नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीला जोडधंदा म्हणून तुम्ही पशुपालन हा व्यवसाय करता. परंतु पशुपालन करत असताना त्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे गरजेचे असते. पशुपालन करत असताना चारा व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण चारा व्यवस्थापन व्यवस्थित झाले, तरच पशुपालन व्यवसाय हा फायदेशीर ठरू शकतो. त्यासाठी वर्षभर पुरेल असं चारा व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, यामध्ये हिरवा चारा, वाळलेला चारा अशा पद्धतीने वर्गीकरण करून त्याचे व्यवस्थापन करता येते. वाळला चारा आपण वर्षभर सहजरीत्या साठवण करून ठेवू शकतो, परंतु हिरवा चारा वर्षभर पुरेल अशा पद्धतीने त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यामध्ये ज्या भागांमध्ये पाण्याची उपलब्धता जास्त असेल, त्या भागात शेतकरी वर्षभर हिरवा चारा आपल्या शेतामध्ये पिकवू शकतात परंतु काही दुष्काळी भागामध्ये शेतीसाठी वर्षभर पाणी उपलब्ध होत नाही, अशा वेळेस जनावरांना वर्षभर हिरव्या चाऱ्याचे व्यवस्थापन करणे खूप अवघड होते. परंतु याला पर्याय म्हणून मुरघास करणे योग्य ठरू शकते मुरघास हा वर्षभर टिकू शकतो.

मुरघास म्हणजे काय हे बघूया

मुरघास म्हणजे हिरव्या चाऱ्याची कुट्टी करून त्यामध्ये कल्चर, गुळपानी किंवा मिठ असे वेगवेगळे मिश्रण कुट्टी मध्ये एकत्र करून त्याला हवा विरहित किंवा हवाबंद जागेत साठवण करून ठेवणे. आपल्याला गरज लागेल त्यावेळेस तो वापरणे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हिरव्या चाऱ्याचं लोणचं घालने यालाच मुरघास असे म्हणतात

मुरघासासाठी कोणती चारा पिके जास्त फायदेशीर ठरू शकतात याबद्दल जाणून घेणार आहोत

यामध्ये मका, कडवळ, बाजरी ही सर्व पिके मुरघास करण्यासाठी सर्वात जास्त योग्य समजली जातात. यांना योग्य समजण्याचं कारण म्हणजे यामध्ये शर्करेचे प्रमाण जास्त असते त्याचबरोबर उसाचे वाढे देखील मुरघास बनवण्यासाठी वापरू शकता.

आता यापुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुरघास बनवण्यासाठी चारा पिकाची कापणी केव्हा करावी किंवा त्यांचा योग्य कालावधी कोणता असावा

मुरघास बनवण्यासाठी चारा पिकाची कापणी करण्यासाठी ते पीक तुऱ्यामध्ये किंवा चिकाऱ्या मध्ये असणे गरजेचे आहे. मका पिकाबद्दल बोलायचं झाल्यास, मक्याचे कणीस तयार होत असताना त्याच्या दाण्यामधून दुधासारखा रस येत असावा, तसेच कडवळ आणि ज्वारी हे पीक चिकाऱ्या मध्ये असणे गरजेचे आहे. ज्यावेळी मका कडवळ बाजरी ही पिके तुऱ्यामध्ये असतात त्यावेळी त्या पिकाच्या ताटामध्ये पूर्णपणे न्यूट्रिशन प्रोटीन इत्यादी घटक असतात. म्हणजे त्या पिकाचे सर्व अवशेष हे सर्व घटकांनी परिपूर्ण व पौष्टिक असतात अशा वेळेस मुरघास केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. परंतु या पिकांची कणसे त्यातील दाना पूर्ण पक्व झाल्यास त्या पिकाच्या ताटामध्ये किंवा चिपाडामध्ये न्यूट्रिशन हे अजिबात राहत नाहीत. ते सर्व त्या पिकाच्या दाण्यांमध्ये एकवटतात अशावेळी पिकांच्या इतर चिपाडामध्ये किंवा ताटामध्ये पौष्टिकता नसते.

पाहुयात मुरघास साठवण्याची पद्धत –

मुरघास साठवणीसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे बॅगांचा वापर केला जातो. यामध्ये 50 किलो पासून तीन टनापर्यंत बॅग मिळतात. बॅगांमध्ये मुरघास भरण्याअगोदर त्याला आतून प्लास्टिक बॅग वापरली जाते. दुसरी पद्धत म्हणजे खड्डा पद्धत यामध्ये जमिनीमध्ये खड्डा खोदून त्याला शेततळ्याचा कागद वापरून त्यामध्ये मुरघास साठवता येतो. तिसऱ्या पद्धतीमध्ये बंकर पद्धत, बंकर पद्धतीमध्ये आपल्याला जमिनीच्या वरती हवाबंद असे बांधकाम करून त्यामध्ये मुरघास करता येतो. आणि चौथी पद्धत म्हणजे बेलर किंवा गठ्ठे पद्धत यामध्ये मशीन मध्ये मकाची कुट्टी भरून त्याची मशीनच्या आधारे दाब देऊन गठ्ठे बनवले जातात, व त्याला प्लास्टिक पेपरच्या सहाय्याने गुंडाळले जाते परंतु ही पद्धत जास्त खर्चिक असते.

आता आपण मुरघास करण्याची पद्धत

मुरघास करण्यासाठी मुख्यता मका या पिकाचा वापर केला जातो. यामध्ये तुम्ही कडवळ मका उसाचे वाढे, बाजरी आणि सुपर नेपियर अशा पिकांचा मुरघासासाठी वापर करू शकता. परंतु शेतकरी मुरघास बनवण्यासाठी मका या पिकाचा जास्त वापर करतात कारण मका या पिकाचा मुरघास करणे शेतकऱ्यांसाठी सोपे आणि जास्त फायदेशीर ठरते. कारण मका कापणी पासून मुरघास करेपर्यंत सर्व प्रक्रिया सोप्या पद्धतीने करता येतात. मका पिकामध्ये कोणतेही कल्चर किंवा इतर कोणतेही मिश्रण न वापरता फक्त मका पिकाचा चांगल्या प्रतीचा मुरघास तयार होतो. मुरघास करण्यासाठी वापल्या जाणाऱ्या हिरव्या चाऱ्यात पाण्याचे प्रमाण कमी होणे खूप अत्यावश्यक असते कारण पाण्याचे प्रमाण जास्त राहिले तर मुरघासाला बुरशी लागू शकते, परिणामी असा मुरघास खराब होतो. त्यामुळे चारा तोडल्यानंतर तो सुकवून त्याची कुट्टी करणे किंवा कुट्टी केल्यानंतर ती सुकविने त्यानंतरच बॅग भरण्यास सुरवात करावी. बॅग भरतेवेळी कल्चर किंवा गुळपाणी किंवा मिठ वापरत असताना कुट्टीचे थर देऊन त्यामध्ये वापर करावा, त्यानंतर प्रत्येक थर चांगला दाबून घ्यावा जेणेकरून त्यात हवा राहत नाही. बॅग भरून झाल्यावर हवा जाणार नाही अशा पद्धतीने पॅक करा. शक्य असल्यास पॅक करते वेळी त्यातील हवा काढण्यासाठी दूध काढणीच्या मशीनच्या सहाय्याने त्यातील हवा काढून बॅग पॅक करू शकता. मुरघास पूर्ण पक्व होण्यासाठी 45 दिवस लागतात त्यानंतर तुम्ही तो मूरघास वापरू शकता.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *