Chandrakant Patil । भाजप कसं गाठणार 400 चा आकडा? चंद्रकांत पाटलांनी सांगितलं समीकरण

Chandrakant Patil

Chandrakant Patil । लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपला 400 पार कसं गाठता येईल? याच गणित मांडलं आहे. (Latest marathi news)

Eknath Khadse । भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु असतानाच एकनाथ खडसे यांना बसला सर्वात मोठा धक्का

गुढीपाडव्यानिमित्त आज महायुतीचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांच्या प्रचार कार्यालयाचे काेल्हापूर येथे उदघाटन झाले असून त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “आत्ताच आपल्याकडे 353 जागा असून आपल्याला केवळ 47 जागा जिंकायच्या आहेत. त्या झाल्या की अब बार 400 पार होतील. हे मोठं टार्गेट नसून सर्व मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जिंकण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी झटून काम करावे असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.

Lok Sabha Elections 2024 । काँग्रेस नेत्याचे धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, “निवडणुकीत माझ्या मुलाचा पराभव झाला पाहिजे”

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, “अबकी बार 400 पार हा आकडा आता विरोधकांना ही विश्वास वाटायला लागला आहे. प्रशांत किशोर म्हणतात की 2024 ला आपण आराम केला पाहिजे. आपले पैसे आणि श्रम वाचेल. मोदींनी जाती पाती पलीकडे जाऊन लाभार्थी नावाची जात निर्माण केली असून जो गरजु त्याला लाभ दिला,” असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Nana Patole । विशाल पाटील नॉट रिचेबल नाना पटोलेंनी दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “ही निवडणूक…”

Spread the love