आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ह्रता दुर्गुळे (Hruta Durugule) होय. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. इंस्टाग्राम अकाउंटवर ह्रताचे २ मिलियनहून कधी फाॅलवर्स आहेत. ती तरुणांची अत्यंत लाडकी अभिनेत्री आहे. नुकताच पार पडलेला ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्यात ‘पाॅप्युलर फेस ऑफ दे इअर’चा किताब ह्रताने पटकावला आहे.
‘आता तरी प्रेक्षकांचा वनवास संपवा’, रंग माझा वेगळा मालिकेचा ‘तो’ प्रोमो
या पुरस्काराविषयी बोलताना ह्रता म्हणाली की, महाराष्ट्राचा फेवरेट कोण या पुरस्कार सोहळ्याचे हेच वैशिष्ट्य आहे की, हा पुरस्कार ज्या कलाकारांच्या हातात असतो, त्या कलाकारांना प्रेक्षकांनी त्यांचे मत दिलेलं असते. त्यामुळे अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांकडून मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी खूप जवळचा आणि महत्वाचा आहे. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणून मिळालेला पुरस्काराची भेट आयुष्यभर एक स्पेशल पुरस्कार बनवून राहील.
शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! आजच जमा होणार खात्यात पीएम किसान योजने
दरम्यान, दुर्वा, फुलपाखरू आणि मन उडू उडू झालं या मालिकांमधून पुढे आलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे ह्रता दुर्गुळे होय. हृताने फुलपाखरू या मालिकेत साकारलेले वेदहीचे पात्र प्रत्येक घराघरात पोहोचले. मालिकांमध्ये चमकल्यानंतर ह्रताने सिनेमा, नाटक आणि वेब सिरीजमध्ये नाव कमावले आहे. महाराष्ट्राची क्रश आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे कोणत्या ना कोणत्या कारणामुळं नेहमीच चर्चेत असते.