
राज्यभरात सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. दरम्यान कॉपीमुक्त परीक्षेसाठी परीक्षा मंडळाकडून विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. मात्र, तरी देखील कॉपीचा प्रकार घडत आहे. दरम्यान, बारावी पेपरफुटी प्रकरणी (HSC Paper Leak Case) पोलिसांनी अजून दोघांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे.
“…यांना शरम नाही”, उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका
माहितीनुसार, दोघेही बुलढाण्यातील (Buldhana) लोणार तालुक्यातील (Lonar Taluka) खाजगी शाळेवरील शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. पेपरफुटी प्रकरणात याआधी देखील काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आणि आता देखील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आता आरोपींची संख्या सातवर पोहचली आहे.
तरुणीने पहिल्यांदा रणबीरला किस करण्याचा प्रयत्न केला अन् नंतर लागली रडायला, पाहा व्हायरल व्हिडीओ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉपी प्रकरणात शकील शे. मुनाफ (रा.लोणार) आणि अंकुश पृथ्वीराज चव्हाण (रा. सावरगाव-तेली, ता. लोणार) अशी ताब्यात घेतलेल्या दोन शिक्षकांची नावे आहेत.
नात्यात वाद होऊ नयेत म्हणून नवरा बायकोने टाळाव्यात ‘या’ सवयी