HSC Result | आली ‘निकाल घटिका’ समीप ! प्रतीक्षा संपली ; बारावीचा निकाल उद्या दुपारी दोन वाजता जाहीर होणार

pc facebook

दहावी व बारावीच्या गुणांवरून करिअरची दिशा ठरत असते. म्हणून या परीक्षांना प्रचंड महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक ( SSC) व उच्च माध्यमिक शिक्षण ( HSC) मंडळाकडून घेण्यात आलेल्या यंदाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार ? याकडे पालक, विद्यार्थी व शिक्षकांचे डोळे लागले होते. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. उद्या (ता.२५) ला दुपारी ठीक दोन वाजता बारावीच्या परीक्षेचा निकाल लागणार आहे.

Electric Bullet | रॉयल एनफिल्ड लाँच करणार इलेक्ट्रिक बुलेट ! कंपनीने गुंतवले एक हजार कोटी

यंदाची बारावीची (HSC) परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत पार पडली. बारावीच्या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी दोन वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.

Cabinate Meeting | शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई होणार ! देवेंद्र फडणवीस यांनी दिले आदेश

बारावीचा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ

१) mahahsscboard.in
२) mahresult.nic.in

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा परीक्षा क्रमांक व आईचे नाव टाकावे लागते. तसेच जन्मतारीख, प्रवेशपत्र, ओळखपत्र यांसारखे तपशील सुद्धा लागतात.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *