Maharashtra politics । राज्यात काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) पार पडतील. निवडणूक आयोग कधीही तारखा जाहीर करू शकते. लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) मोठा फायदा होताना दिसत आहे. इनकमिंग सुरूच असून अशातच आता शेकडो गाड्यांचा ताफा झाला मुंबईला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest marathi news)
आज बीडमधील आजी, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडेल. यामुळे बीडमधील क्षीरसागर कुटुंबातील राजकारणाला मोठा फटका बसणार असून अजित पवार गटाचे युवा नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना बायपास करून हा प्रवेश सोहळा होत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
Crime News । धक्कादायक! अहमदनगरमध्ये ऊसतोड मजुराने झाडल्या मुकादमावर गोळ्या, कारण जाणून व्हाल चकित
यावर राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ज्या कार्यकर्त्यांनी आधीच तीनदा पक्षप्रवेश केला आहे, ते पुन्हा एका पक्ष बदलत आहेत इतकेच, ते फक्त बातमीसाठी पक्ष बदलत आहेत. यामुळे संदीप क्षीरसागर यांना कोणताही फरक पडणार नाही,” असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
Maharashtra politics । उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! बड्या नेत्याची आज होणार एसीबी चौकशी