Dhangar Reservation । अहमदनगर : मागील काही दिवसांपासून आरक्षणावरून (Reservation) राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. अगोदर मराठा समाज (Maratha Reservation) त्यानंतर ओबीसी (OBC Reservation) आणि धनगर समाजाकडून देखील आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा या तिन्ही समाजाने घेतला आहे. दरम्यान, धनगर समाजाचे चौंडी येथे आमरण उपोषण सुरु आहे. (Latest Marathi News)
Crime News । चक्क प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून 2 किलो सोन्याच्या पेस्टची तस्करी, दोघांना अटक
आज या आंदोलनाचा पंधरवा दिवस असून यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाला (Dhangar Reservation Protest) एसटी संवर्गत समावेश करावं या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिलं होतं. काल त्याची मुदत संपली असून आता या आंदोलनाला कोणते वळण लागणार हे पहाणं महत्त्वाचं असेल.
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्याची तब्येत खालावली आहे. अण्णासाहेब रुपनवर असे या उपोषणकर्त्याचे नाव आहे. त्यांना अगोदर अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होतं. परंतु आता त्यांची प्रकृती जास्त खराब झाल्याने त्यांना पुण्याला हलविले आहे. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Kangana Ranaut । मागच्या 12 महिन्यापासून कंगना सतत आजारी; पोस्ट शेअर करत केला धक्कादायक खुलासा