अर्पिता ही सलमान खानची (Salman Khan) बहीण आहे. २०१४ मध्ये तिने आयुष शर्मासोबत लग्न केले. अर्पिता (Arpita) चित्रपट कुटुंबाचा भाग असल्याखेरीज इतर कोणत्याही प्रकारे चित्रपटांशी संबंधित नव्हती. मात्र तिला दररोज ट्रोल केलं जातं. कधी तिच्या वजनाची खिल्ली उडवली जाते, तर कधी तिच्या रंगाची. आता तिचा पती आयुष शर्मा या ट्रोलिंगवर बोलला आहे.
Rakhi Sawant: मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राखी सावंत घेणार थेट नरेंद्र मोदींची भेट!
त्याचबरोबर पुढे तो म्हणाला, “तुम्हाला हे मान्य करावे लागेल की सौंदर्य ही आता आंतरिक गोष्ट नाही.आपण एक चांगले व्यक्ती आहात की नाही हे कोणालाही जाणून घ्यायचे नाही. लोकांना फक्त तुमचे बाह्य सौंदर्य बघायचे असते. पण मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे. त्याचरोबर अर्पिता म्हणाली की ‘मी सेलिब्रिटी नाही.मी काहीही केले नाही. तसेच मी कधीही कॅमेऱ्यासमोर जाणार नाही. म्हणूनच मी जशी आहे तशीच राहीन. मला हवं तसं मी माझं आयुष्य जगेन.”
खुशखबर! शेतकऱ्यांना स्वस्तात दिवसा वीज मिळणार; राज्य सरकारने राबवली नवीन योजना
आयुषने सलमान खान प्रॉडक्शनच्या ‘लवयात्री’ (loveyatri) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तो अखेरचा सलमानसोबत ‘अंतिम’ चित्रपटात दिसला होता. नुकताच आयुष Tedx प्लॅटफॉर्मवर पोहोचला. येथे त्याने अर्पिताच्या वजनाची आणि रंगाची खिल्ली उडवल्याच्या मुद्द्यावर बोलला आहे. तो म्हणाला, “माझ्या पत्नीला जास्त वजनामुळे सतत ट्रोल केले जाते. ती नेहमीच लोकांच्या निशाण्यावर असते. कारण सेलिब्रिटी असल्याने ती लठ्ठ नसावी. तिने विशिष्ट पद्धतीने वेषभूषा करावी” आयुष म्हणतो की, चांगला माणूस होणं हे सौंदर्याचा मापदंड राहिलेलं नाही.
Arjun Tendulkar: ‘या’ महिला क्रिकेटरच्या प्रेमात अर्जून तेंडूलकर? दोघांचे प्रायव्हेट फोटोही आले समोर