
स्त्री-पुरुष हे एकमेकांना परस्पर पूरक मानले जातात. याच गोष्टीवर या दोघांचे नाते ( Relationship) टिकते. मात्र, बऱ्याचदा या नात्यात भांडणे देखील होतात. याला कारणीभूत असतात दोघांच्याही काही सवयी ! एकेमकांच्या काही सवयी न आवडल्याने नात्यात मोठे-मोठे वाद निर्माण होतात. हे वाद टाळण्यासाठी आधी त्या सवयी कोणत्या हे जाणून घेऊयात.
मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतल्याच्या आरोपावर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…
1) गरजेपेक्षा जास्त शंका घेणे
शंका ही गोष्ट खरंतर नातं कमकुवत करणारी असते. बऱ्याचदा पुरुष आणि महिला एकमेकांवर संशय घेतात यामुळे त्यांच्यात वाद होतात. फोन का उचलला नाही ?कोणासोबत बोलत होता ? यांसारख्या चौकश्या कोणालाच आवडत नाहीत. त्यामुळे सतत या चौकश्या केल्यास नात्यात दुरावा येतो. त्यामुळे सतत संशय घेऊन तुमच्या प्रिय व्यक्तिवर जास्त नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका.
सॅमसंगच्या ‘या’ लोकप्रिय फोल्डेबल फोनवर मिळवा 49 टक्केंची सूट! वाचा भन्नाट ऑफर
2) विश्वास न ठेवणे
विश्वास ( Trust) हा नात्यांचा पाया असतो. जर नात्यात विश्वासाचा पाया भक्कम असेल तर नाते भक्कम राहते. मात्र तुम्ही तुमच्या पार्टनरवर सतत अविश्वास दाखवत असाल तर तुमचे नाते खराब होऊ शकते. यामुळे आपले नाते टिकवण्यासाठी व सुस्थितीत ठेवण्यासाठी पार्टनर वरचा विश्वास ढळू देऊ नका.
“सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतलं” शिंदे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप
3) आवाजवी अपेक्षा ठेवणे
भल्या मोठ्या अपेक्षा हे नाते डगमगण्याचे मूळ कारण असते. बऱ्याचदा आपल्या पार्टनर कडून आपण अपेक्षा ठेवतो आणि ती अपेक्षा पूर्ण नाहीच झाली तर वाद होतात. यामुळे नात्यात फार मोठ्या अपेक्षा ठेवणे टाळावे. यामुळे नाते छान राहते.
“सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतलं” शिंदे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप