बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून संजय दत्तला ओळखले जाते. गेल्यावर्षी केजीएफ 2 ( KGF 2) या चित्रपटामध्ये तो झळकला होता. कर्करोगासारख्या गंभीर आजारातून प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने मात केली आहे. परंतु, तरीही कर्करोगाचा सामना करत असताना त्याला देखील मरण्याची इच्छा झाली होती. असे वक्तव्य संजय दत्तने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये केले आहे.
मोठी बातमी! ‘या’ मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुण्यातील अलका चौकात आंदोलन
या मुलाखती दरम्यान संजय दत्तने ( Sanajay Datta) त्याच्या कर्करोगाच्या प्रवासाबद्दल सांगितले. यावेळी तो म्हणाला की, केजीएफच्या शूटिंगमध्ये मला पाठदुःखीचा त्रास होत होता. यावेळी गरम पाणी व औषधे घेऊन मी आराम केला. परंतु, एके दिवशी अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मी डॉक्टरांकडे गेलो. दरम्यान कर्करोगाचे निदान झाले.
“पुण्याच्या नामांतराची गरज नाही”; अमोल मिटकरींच्या मागणीला आनंद दवेंचा विरोध
याशिवाय कर्करोगाचे निदान होताच डॉक्टरांनी संजय दत्तला किमोथेरपी घेण्याचा सल्ला दिला. मात्र संजय दत्त ला किमोथेरपी घ्यायची नसल्याने त्याने स्वतःला संपवण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र पत्नी मान्यता दत्त व बहिणी यांनी घेतलेल्या काळजीने व डॉक्टरांनी केलेल्या मदतीमुळे संजय दत्त ने कर्करोगावर मात केली होती. अशी माहिती संजय दत्त यांने दिली आहे.
अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला दिल्याने पोलिसांकडून थेट पालकांवरव कारवाई