गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ऋषभ (Rishabh Pant) पंतच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये ऋषभ मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी झाला होता यानंतर त्याच्यावर जवळपास एक ते दीड महिना रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. यांनतर मागच्या काही दिवसापूर्वी त्याला रुग्णालयामधून डिचार्ज दिला आणि घरी आराम करण्यास सांगितले.
हास्यजत्रा फेम गौरव मोरे सोबत सुजय विखे पाटील यांचा भन्नाट डान्स; पाहा Video
दरम्यान, सध्या ऋषभ पंत सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ फूड डिलिव्हरी अॅपच्या जाहिरातिचा आहे. त्यामध्ये ऋषभ म्हणत आहे की, ‘जर सगळे खेळत असतील तर मी का नाही? मी अजूनही गेम बॉसमध्ये आहे! मी खेळायला येतोय’ असं यामध्ये ऋषभ म्हणत आहे.
सर्वांत मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा केल्याप्रकरणी ४०० ते ५०० जणांवर गुन्हे दाखल
ही फूड डिलिव्हरी अॅपची जाहिरात आहे मात्र ही जाहिरात सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. IPL 2023 सुरू होण्यापूर्वी हा व्हिडीओ समोर आल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओवर नेटकरी देखील वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
Rishabh Pant is back! pic.twitter.com/3uu51Nz0AO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 29, 2023
मोठी बातमी! रामनवमी उत्सवादरम्यान ‘या’ मंदिरात लागली भीषण आग; घटनेचा व्हिडीओ व्हायरल