स्पर्धा परीक्षा देऊन समाजसेवा करणं हे स्वप्न अनेक तरुण पाहतात. पण त्यातील यशस्वी होणाऱ्या तरुणांची संख्या फक्त 0.1 टक्के आहे. यामुळे अनेकांचे अधिकारी होण्याचे स्वप्न हे फक्त स्वप्नच राहते. परंतु, सोलापूर जिल्ह्यातील रोहिणी भाजीभाकरे (Rohini Bhajibhakare) ही कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर आयएएस अधिकारी ( IAS Officer) झाली आहे.
सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले तर महाराष्ट्रातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही – राहुल गांधी
आपल्या वडिलांना सरकारी कामासाठी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. या गोष्टीने रोहिणी भाजीभाकरे ही प्रचंड व्यथित झाली होती. यामुळे तिने आयएएस अधिकारी होण्याचे ठरविले होते. याच जिद्दीच्या जोरावर रोहिनीचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
धक्कादायक! आफताबच्या २५ गर्लफ्रेंड्स असल्याची माहिती आली समोर
रोहिणी रामदास भाजीभाकरे हिने सरकारी शाळेत आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. यानंतर पुण्यातील शासकीय महाविद्यालयातून पदवी मिळवल्यानंतर तिने यूपीएससी परीक्षेची ( UPSC Exam) तयारी सुरू केली. कोणताही कोचिंग क्लास लावता रोहिणीने हे यश मिळवले आहे.
म्हशींची दूध क्षमता वाढवण्यासाठी ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन दिल्याने दुग्ध उत्पादकांना अटक
पूर्णतः शेतकरी कुटुंबातील असणाऱ्या रोहिणीने 2008 मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली होती. सध्या तिचे लग्न झाले असून तिच्या पतीचे नाव विजेंद्र बिदरी असे आहे. रात्रंदिवस मेहनत करून रोहिणी या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचली आहे.
महाविद्यालयाच्या परिसरात मुलींची तुफान हाणामारी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल