एकनाथ शिंदेनी बंडखोरी करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यांनतर मूळ शिवसेना (Shivsena) नेमकी कोणाची हा वाद सातत्यानं चर्चेत येत आहे. नंतर हा वाद निवडणूक आयोग आणि सर्वाेच्च नायालयासमोर गेला असून त्यांच्यासाठी देखील हा वाद आता एक मोठं आव्हान ठरत आहे. यामध्येच आता धनुष्यबाण एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनाच मिळणार असा विश्वास खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केलाय. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
मोठी बातमी! ‘या’ मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुण्यातील अलका चौकात आंदोलन
नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या, मला विश्वास आहे की, येत्या काळात बाळासाहेबांची विचारधारा शिंदेंसोबत असूनत्यांनाच धनुष्यबाण मिळणार असा माझा विश्वास आहे. ,मला देवावर आणि हनुमान चालिसावर विश्वास आहे. असं त्या म्हणाल्या आहेत. त्या अमरावतीमध्ये बोलत होत्या.
“पुण्याच्या नामांतराची गरज नाही”; अमोल मिटकरींच्या मागणीला आनंद दवेंचा विरोध
त्याचबरोबर नवनीत राणा पुढे म्हणाल्या, एकनाथ शिंदे याना पुढच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण चिन्ह मिळेल आणि त्याच चिन्हावर ते आपले उमेदवार मैदानात उतरवतील, असा माझा विश्वास आहे.
पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे, राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांची मोठी मागणी