गौतमी पाटीलला ओळखत नाही, असा माणूस महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. गौतमीचे महाराष्ट्रभर चाहते आहेत. तिच्या कार्यक्रमांना लोकांना बसायला जागा उरत नाही एवढी गर्दी असते. अनेकदा बदनामी झाली, लोकांनी टीका केली परंतु तरी देखील गौतमी पाटीलने ( Gautami Patil) नाचायचे सोडले नाही. गौतमीचा सोशल मीडियावर सुद्धा मोठा चाहतावर्ग आहे. याठिकाणी सक्रिय राहून ती आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या पोस्ट व व्हिडिओ टाकत असते.
गौतमीने नुकतीच @theoddEngineer या चॅनेलला मुलाखत दिली आहे. यामध्ये गौतमीला “तू तमाशा करते का लावणी?” असा थेट प्रश्न विचारण्यात आला होता यावर तिने दिलेलं उत्तर ऐकून नेटकरी देखील हैराण झाले आहे. या प्रश्नाच उत्तर देत गौतमी म्हणाली, “मी पूर्णपणे लावणी करत नाही त्यामुळे माझ्या शो ला लावणीचा कार्यक्रम म्हणायची गरज नाही, तो एक डीजे शो आहे”.
Accident । कार आणि बाईकचा विचित्र अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू
त्याचबरोबर ती पुढे म्हणाली, ” मी माझ्या करिअरची सुरुवात लावणीपासूनच केली, अकलूज लावणी महोत्सवमध्ये मी पहिल्यांदा डान्स केला मात्र नंतर मी लावणीचे प्रशिक्षण घेतलेले नाही, त्यामुळे लावणी कशी असते, कशी करतात याबाबत मी अभ्यास केलेला नाही” अशी गौतमी स्प्ष्ट म्हणाली आहे. सध्या तिच्या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहे.