अथांग वेब सिरीजच्या ट्रेलरची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. या वेबसीरिजच्या ट्रेलर लाँचिगला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. त्याचबरोबर त्यांच्या खासगी जीवनाबद्दल देखील मोठे खुलासे केले आहे.
राखी सावंतने केला धक्कदायक खुलासा; म्हणाली, “आदिलने मला लाथेने मारलं…”
या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी त्याच्या राजकारणात येण्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. राज ठाकरे म्हणाले, मी राजकारणामध्ये अपघातानं आलो आहे. माझं पॅशन हे फिल्ममेकींग असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी अथांग वेब सिरीजच्या टीमला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
अजित पवारांनी सांगितले डोक्यावरील केस जाण्याचे कारण; म्हणाले, “रामदेव बाबांनी सांगितले म्हणून…”
त्याचबरोबर राज ठाकरे म्हणाले, मी द ऑफर ही वेब सिरीज पाहिली असून मला ती वेबसिरीज पुन्हा पुन्हा पाहावी असे वाटते. ती वुटवर आहे. ते लोक जो काळ दाखवतायेत तशी साधन आपल्याकडे नाहीत. मात्र तरी देखील आपल्याकडील लोक ते दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यांचं कौतुक आहे, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
गद्दारांचे सरकार फक्त होर्डिंग्जवाल्यांची कर्ज मुक्ती करत आहे; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट