पुणे: मागच्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भगतसिंग कोश्यारी चर्चेत असतात. यामध्येच आता भगसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एकदा कोश्यारी यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. त्यामुळं ते परत एकदा चर्चेत आले आहेत.
विरोधी पक्षनेते अजित पवार उद्या श्रीगोंदा दौऱ्यावर
‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही, असं विधान भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर पुढे राज्यपाल कोश्यारी म्हणाले, “तुम्हाला भाषण ऐकायचं आहे की बघायचं आहे?”, यामुळे उपस्थित कार्यक्रमात हास्यकल्लोळ उठला. नंतर पुढे भगतसिंग कोश्यारी म्हणाले. ‘मैं मानता ही नही हूं की, मैं राज्यपाल हूँ’ तुम्ही जसे बोलणार, तसे मी करणार’. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चाना उधाण आले आहे.