मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. नुकतीच विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांनी करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण ७’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी या शोमध्ये विजयने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच धक्कादायक खुलासे केले आहे. सध्या त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
या शोमधील बिंगो राऊंडमध्ये विजय देवरकोंडा कशाप्रकारे मेकअपच्या मदतीने त्याने लव्ह बाइट्स लपवले होते हे सांगितलं. त्यावेळी तो म्हणाला, “माझ्या मेकअपमनने कंसीलरच्या मदतीने लव्ह बाइट्स लपवले होते.” याशिवाय सेक्स लाइफबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी सार्वजनिक ठिकाणी सेक्स केलं आहे. बोट, यॉट आणि कारमध्ये मी सेक्स केलं आहे.”
पुढे करण जोहरने विजयला प्रश्न विचारला, कधी थ्रीसम केला आहे का? यावर उत्तर देत विजय म्हणाला, “नाही, पण मी भविष्यात कधीतरी हे करू शकतो.” विजयने दिलेल्या या उत्तरामुळे अनन्या आणि करण यांनाही धक्का बसला. असे खासगी आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे विजय देवरकोंडाने या शो मध्ये केले आहेत.