
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेना पक्षाचे नेते होते. पण त्यांनी आमदार आणि खासदार आपल्यासोबत घेऊन भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिंदेगट आणि ठाकरे गट असंं चित्र पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदेनी शिवसेना (ShivSena) का सोडली असा प्रश्न सर्वांना पडलाय. आता याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे शिवसेना का सोडली हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Madhuri Dixit: माधुरी दीक्षितला गुलाबी साडीत पाहून चाहते थक्क! पाहा PHOTO
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला कायम विरोध केला. त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीशी शिवसेनेच्या नेतृत्वाने युती केली होती. त्यामुळे आम्हीही तेच विचार घेतले. असे एकनाथ शिंदे म्हणाले.
Jayant Patil: जयंत पाटलांनी राज ठाकरेंना दिला सल्ला, म्हणाले, “स्वत:चा पक्ष वाढवावा”
पुढे एकनाथ शिंदे असं म्हणाले की, भाजप आणि आमची नैसर्गिक युती आहे. भाजपबरोबर आम्ही युती केल्याने जवळपास सर्वजण समाधानी आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षात बारकाईने लक्ष देत होते. मी 17 वर्षाचा असल्यापासून शिवसेनेमध्ये काम करतोय. सगळं आयुष्य शिवसेनेसाठी खर्च केलं असताना, अशा वेळी मी शिवसेना सोडण्याचा विचारही करू शकत नाही. तसे माझ्या मनातही कधी येणार नाही. असं देखील ते म्हणाले.