
मागच्या काही दिवसापुर्वी भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनामा देणार असल्याची माहिती दिली होती. यांनतर नवीन राज्यपाल कोण असणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. याबाबत अनेक चर्चा चालू होत्या. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा (Resignation) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल रमेश बैस नेमके कोण आहेत? वाचा याबद्दल सविस्तर
त्यामुळे आता रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता कोश्यारी यांनी राजीनामा देताच विरोधकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली आहे. आता यावर शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “महापुरुषांचा अपमान…”
शरद पवार म्हणाले, “माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली. हा निर्णय खूप आधीच घ्यायला पाहिजे होता. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी व्यक्ती कधीही राज्यपाल म्हणून झाली होती, मात्र केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी त्यामध्ये बदल केला, ही एक समाधानकारक बाब आहे.” अशा शब्दात शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “महापुरुषांचा अपमान…”