
नोव्हेंबर 2019 मधला ‘तो’ पहाटेचा शपथविधी ! त्या शपथविधीने राजकीय वर्तुळात उडालेली खळबळ. त्यानंतर भाजपला बसलेला धक्का आणि महाराष्ट्रात स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार अवघा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. दरम्यान ‘तो’ पहाटेचा शपथविधी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
सर्वात मोठी बातमी! पहाटेच्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस यांनी केला मोठा गौप्यस्फोट
तो शपथविधी शरद पवारांसोबत चर्चा करूनच झाला होता, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखती दरम्यान केले आहे. 23 नोव्हेंबर 2019 च्या सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र हे सरकार अवघ्या 72 तासांत कोसळले. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कधीच स्पष्ट वक्तव्य केले नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यावर आता स्पष्ट बोलले आहेत.
सर्वात मोठी बातमी! पहाटेच्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस यांनी केला मोठा गौप्यस्फोट
त्यावेळी आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती, की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट हवंय, यासाठी आपण सरकार तयार करूया. राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो, तेव्हा चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय केला आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी जी चर्चा झाली ती शरद पवार साहेबांशीच झाली होती. ती काही खाली झालेली चर्चा नाही. शरद पवारांशी ( Sharad Pawar ) चर्चा झाली त्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे, त्यामुळे त्याठिकाणीही आमच्यासोबत विश्वासघातच झाला. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
लग्न कार्यात काम करायला गेल्या होत्या मात्र घरी परतल्याच नाहीत; वाटेतच काळाने घातला घाला