“आपण कसबा जिंकू याची मला खात्री नव्हती पण…” शरद पवारांचे मोठे वक्तव्य

"I was not sure that we will win Kasba but..." Sharad Pawar's big statement

नुकतच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये चिंचवडमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. तर कसब्यात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला आहे. कसब्याला भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा मात्र महाविकास आघाडीतील उमेदवार कसब्यातून निवडून आले आहेत. यामुळे महाविकास आघाडीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामध्येच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

अन् जितेंद्र आव्हाड स्टेजवर पडता पडता थोडक्यात वाचले!

कसबा पोटनिवडणुकीत आपण जिंकणार असं सर्वांना वाटत होते. जनतेचा देखील याबाबत प्रतिसाद होता. मात्र मला स्वत:ला कसब्यात आपण जिंकू याची खात्री नव्हती कारण गिरीश बापट यांच्या जनसंपर्कामुळे कसबा भाजपचा बालेकिल्ला झाला होता. परंतु, धंगेकर यांना समाजातील सर्व स्तरांवर असलेल्या मान्यतेमुळे कसब्यात महाविकास आघाडीला यश मिळाले. असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. सध्या त्यांचे हे वक्तव्य खूप चर्चेत आहे.

होळीच्या दिवशी शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल; कांदा पेटवून केली होळी साजरी

त्याचबरोबर पुढे शरद पवार म्हणाले, उत्तम उमेदवार, पक्षाचा पाठिंबा आणि महाविकास आघाडीतील सर्वांचे मनापासून लढणे, या सर्व गोष्टींमुळे आम्हाला यश मिळाले आहे. अशा शब्दांत शरद पवार यांनी कसब्यातील विजयाबद्दल सांगितले आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

खळबळजनक घटना! डॉक्टर-नर्स उपस्थित नसल्याने आरोग्य केंद्रात आईनेच केली मुलीची प्रसूती

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *