मुंबई: सध्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची (Nagpur Winter Session) सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. यावेळी विधानसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अपशब्द वापरल्या प्रकरणी राष्ट्रवादी (nationalist) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांना निलंबित करण्यात आले आहे. आता या प्रकरणावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी! जयंत पाटील यांचे निलंबन
यावर प्रतिक्रिया देत जयंत पाटील म्हणाले, “भाषण करत असताना माझा माईक चालू नव्हता. मी भाषण (Speech) करत नव्हतो. अनेक आमदार देखील समोर उभे होते. सर्वांचा आवाज येत होता. अशावेळी आमच्या लोकांना म्हणजे आमचे नेते भास्कर जाधव यांना देखील बोलू दिले जात नव्हते. या सर्व गोष्टींकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे.
रस्त्यावर राहणाऱ्या बालकांसाठी फिरते पथक; ‘अशी’ मिळणार मदत
दरम्यान, नागपूर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटलांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्याचे विरोधापक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून देखील दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
ठाकरे गटाला मोठा धक्का; संजय राऊतांच्या जामीन अर्जावर सही करणारा साक्षीदार शिंदे गटात!