
मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) चर्चेचा विषय ठरत आहेत. काहीना काही त्यांच्यासोबत घडतच आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या संसदीय बोर्डातून त्यांना (BJP Parliamentary committee) हटवण्यात आले आहे. दरम्यान नागपूरमध्ये एका कार्यक्रमात याबाबतीत नितीन गडकरी (nitin gadkari)यांनी उद्योजकांसमोर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांचं वाक्य सांगत म्हणाले की, जेव्हा कोणताही व्यक्ती पराभूत होतो, याचा अर्थ तो संपत नाही मात्र जेव्हा तो स्वत: पराभव स्वीकारतो, त्याचवेळी तो संपतो.
Sanjay Rathod: मोठी बातमी! संजय राठोडांना कोरोनाची लागण, घरातच औषधोपचार सुरू
पुढे गडकरी म्हणाले की, जे ही कोणी व्यवसायात, सामाजिक कार्यात किंवा राजकारणात आहेत, त्यांच्यासाठी इतर माणसांशी त्यांचे असलेले संबंध ही सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे मोलाचा सल्ला देतो की, एखाद्याचे चांगले दिवस असो वा वाईट दिवस असो, जेव्हा तुम्ही ज्या माणसाशी मैत्री केली असेल तर तो हात सोडू नका अस देखील गडकरी म्हणाले.याचवेळी त्यांनी सध्याच्या वापरा आणि फेकून द्या या संस्कृतीचा भाग होऊ नका, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला आहे.
Sonali Phogat: सोनाली फोगट हत्याप्रकरणी अंमली पदार्थ विक्रेत्यासह ५ जणांना अटक
विहिरीत उडी मारेन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही.
नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे नेते श्रीकांत जिचकार यांना चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करा, असे सांगितले होते.तसेच त्यावेळी ते श्रीकांत जिचकार यांना म्हणाले होते की, मी विहिरीत उडी मारुन मरुन जाईन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही. कारण काँग्रेसची विचारधारा आपल्याला पसंत नाही.
याआधी मंगळवारी गडकरी म्हणाले होते की, काही जण राजकीय फायद्यासाठी, माझ्याविरोधात घृणास्पद आणि मनाला येईल ते अभियान राबवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सार्वजनिक कार्यक्रमातील माझ्या वक्तव्यांना आधीच्या संदर्भाशिवाय दाखवण्यात येते आहे.म्हणजेच एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यकमातील त्यांच्या भाषणाची यू ट्यूबची लिंकही त्यांनी समाज माध्यमांवर पाठवली आहे. याच कार्यक्रमातील त्यांच्या एका वक्तव्याचा उपयोग सोशल मीडियावर करण्यात आला होता. आणि यातून राजकारण करण्यात येत आहे.