गौतमी पाटील (Gautami Patil) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गौतमीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. अगदी तरुण वर्गापासून ते म्हताऱ्या लोकांपर्यंत अनेक गौतमीचे चाहते आहेत. गौतमीच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. अगदी थोड्याच कालावधीमध्ये गौतमीने प्रेक्षकांमध्ये स्वतःच एक वेगळंच स्थान निर्माण केल आहे. गौतमी तिच्या नृत्यामुळे सतत चर्चेत असते. गौतमी अनेक मुलाखत देखील देत असते.
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा केली जाईल
नुकतीच गौतमीने एका युट्युब चॅनलला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने असं वक्तव्य केलं आहे की सगळीकडे खळबळ उडाली आहे. यावेळी गौतमीने पहिल्यांदाच लग्नाबाबत भाष्य केलं आहे. गौतमी म्हणाली, पहिल्यापासून मी आणि माझी आईच राहिलो आहेत. आमच्या घरात ना वडील ना भाऊ, माझा कधीच कोणत्या पुरुषासोबत वैयक्तिक संबंध आलेला नाही. घरातील सर्व जबाबदाऱ्या मी आणि माझ्या आईनेच घेतल्या आहेत. त्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्यांचा अर्धा वाटा उचलण्यासाठी तरी एक पुरुष आयुष्यात असायला हवा, अशी माझी इच्छा आहे. याच कारणाने मला लग्न करायचं आहे”. अस गौतमी म्हणाली आहे.
“…तर आयुष्यभर शेतीच करत राहिलो असतो” सैराट फेम लंगड्याने केला मोठा खुलासा!
त्याचबरोबर गौतमीचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये गौतमी म्हणत आहे की, माझ्या लग्नानंतर माझ्या आईच काय होईल याची मला काळजी आहे. मात्र मी एकवेळ नवऱ्याला सोडेल पण आईला कधीच सोडणार नाही असं गौतमी हसतहसत म्हणाली आहे. सध्या याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.