नुकतेच राज्य सरकारने औरंगाबादचे आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर केले. औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नामांतर धाराशिव केले. मात्र यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
पावसाबाबत समोर आली सर्वात मोठी अपडेट; पुढील दोन तीन दिवस महत्वाचे
शरद पवार हे कालपासून छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती संभाजी नगर नामांतराच्या बाबतीत मोठे वक्तव्य केले. शहराच्या नावाला संभाजीनगर नाही तर , औरंगाबाद म्हणायचं असं मोठं विधान त्यांनी केले आहे.
कोल्हापूरच्या घटनेवर ठाकरे गटाची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “विरोधी पक्ष कधीही मागे…”
दरम्यान, यावेळी बोलताना आज सकाळी कोल्हापुरात झालेल्या हिंसाचारावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कोल्हापुरात मोबाईलवर कोणीतरी चुकीचा मेसेज पाठवला, हे चुकीचे आहे. मात्र त्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून, त्याला धार्मिक स्वरूप देणे योग्य नाही.
धक्कादायक घटना! खेळता खेळता तब्बल ३०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडली चिमुरडी, मग त्यानंतर…
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. मात्र राज्यकर्तेच रस्त्यावर उतरत आहेत. राज्यकर्त्यांचे सहकारी रस्त्यावर उतरत आहेत. दोन समाजामध्ये कटूता निर्माण होत आहे, हे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटलं.
Sonu Sood । ओडिशा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सोनू सूदने पुढे केला मदतीचा हात!