राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामध्ये उदयनराजे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता आझाद मैदानावर (Azad Maidan) मोर्चा काढणार असल्याची घोषणा उदयनराजे यांनी केली.
‘या’ कारखान्याची २५०० पहिली उचल; ऊसाचे बिल लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार
विकृत लोकांच्या वक्तव्यावर पांघरुन घालणाऱ्यांना लाज वाटली पाहीजे, असा निशाणा देखील उदयनराजेंनी भाजपवर (BJP) साधला आहे. “सर्व राजकीय लोक स्वत:च्या स्वार्थासाठी राज्यपालांच्या वक्तव्यावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न करत आहेत. याना लाज वाटायला हवी”, असा निशाणा उदयनराजेंनी राज्य सरकारवर साधला.
मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळेंना सेबीचा दणका
यावेळी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले, “जोपर्यंत राज्यपालांची उचलबांगडी होत नाही. तोपर्यंत मी शांत बसणार नाही. “राज्यपालांना पदावरुन हटवावे, ही मागणी कायम असणार आहे. यासाठी आम्ही आझाद मैदानावर आंदोलन करणार आहोत. असं देखील उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.
गायरान जमीनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत