मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी संजय दत्त एक आहे. संजय दत्त हा बॉलिवूडचा हिट अभिनेता आहे पण त्याने खलनायक बनूनही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनेता संजय दत्त (Sanjay Datt) जास्त सक्रिय आहे. दरम्यान ‘KGF Chapter 2’ या चित्रपटात संजय दत्तने अधीरा बनून प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर आता संजय दत्त तमिळमधील ‘थलापती 67’ आणि कन्नडमधील ‘केडी द डेविल’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दरम्यान अलीकडेच ‘केडी द डेव्हिल’ (KD The Devil) या कन्नड चित्रपटाचा हिंदीत टीझर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान या कार्यक्रमात संजय दत्तने पुन्हा एकदा बॉलिवूड आणि दक्षिणेवर वक्तव्य केले.
चक्क माकडाने भरल्या डोळ्यांनी लावली अंत्ययात्रेला हजेरी, सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल
यावेळी बोलताना संजय दत्तने सांगितले की, आता तो अधिकाधिक साऊथ चित्रपटांमध्ये काम करणार आहे. त्याचबरोबर आजच्या काळात बॉलिवूडने दक्षिणेकडून काय शिकले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. संजय दत्त म्हणाला, ‘मी केजीएफमध्ये काम केले आहे आणि आता मी केडी – द डेव्हिलमध्ये दिग्दर्शक प्रेमसोबत काम करत आहे. मला असे वाटते की आता मी आणखी दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करणार आहे.
पुढे बोलताना संजय दत्त म्हणाला की,” मी केजीएफ आणि एसएस राजामौलीसोबत काम केले आहे. मी पाहिले की येथे खूप उत्कटतेने, प्रेमाने आणि उर्जेने चित्रपट बनवले जातात. म्हणून मला अस वाटते की बॉलिवूडने हे सर्व विसरू नये. कारण बॉलिवूडने आपली मुळे कधीही विसरता कामा नये.”
भटक्या कुत्र्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर
‘केडी – द डेव्हिल’ या चित्रपटाविषयी सांगायचे तर, या चित्रपटात ध्रुव सर्जा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा 1970 च्या दशकातील आहे. या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे 2023 मध्ये हा चित्रपट कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी या भाषेत प्रदर्शित होणार आहे.
T20 World Cup: सुपर 12 चा टप्पा आजपासून सुरू, टीम इंडिया कधी आणि कोणत्या संघाशी भिडणार? वाचा सविस्तर