कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनस्तर्फे (ICSE) घेण्यात येणाऱ्या दहावी परिक्षेच्या निकालबाबत मागच्या काही दिवसापासून अनेक अफवा पसरवल्या जात होत्या. सोशल मीडियावर देखील याबाबत मोठी चर्चा होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील गोंधळ उडाला होता. दरम्यान आज आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षेचा निकाल दुपारी तीन वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे.
Home Loan | ‘या’ बँका देतात स्वस्तात मस्त गृहकर्ज! एकदा माहिती वाचून बघाच
सीआयएससीईने (CISC) निकालाबाबतचे स्पष्टीकरण शनिवारी सायंकाळी अधिकृतपणे जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थी आज त्यांचा निकाल पाहू शकतात. विद्यार्थ्यांना ”https://cisce.org” आणि ”https://results.cisce.org” या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे, याबाबत माहिती सीआयएससीई कडून देण्यात आली आहे.
Maharashtra Politics | पहाटेचा शपथविधी हा भाजपचा गनिमी कावा होता; भाजपच्या बड्या नेत्याने केला दावा
ICSE दहावीची परीक्षा 27 फेब्रुवारी ते 29 मार्च या दरम्यान पार पडली. तर ISC (12वी) परीक्षा 13 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत पार पडली. यांनतर निकालाची विद्यार्थ्यांना व पालकांना उत्सुकता होती. दरम्यान आज या परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. या वर्षी सुमारे अडीच लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते.