Site icon e लोकहित | Marathi News

बनावट नोटा ओळखा आता चक्क मोबाईलवर! करा ‘या’ अँप्सचा वापर

Identify fake notes now on mobile! Use these amps

सध्याच्या काळात पैशाला विशेष महत्त्व आहे. पैसा हैं तो सबकुछ हैं! अशी वाक्ये आपण कायम ऐकत असतो. दरम्यान बाजारात चलनी नोटांचे मूल्य अधिक असते. यामुळे बऱ्याचदा बनावट नोटा वापरून आपली फसवणूक केली जाते. अशावेळी आपण सतर्क राहणे आवश्यक आहे. मागील पाच वर्षांमध्ये बनावट नोटा चलनात येण्याचे प्रमाण जवळपास 197 पटीने वाढले आहे. या बनावट नोटांमुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते. म्हणून वेळीच खऱ्या नोटांची ओळख करून घेणे आवश्यक आहे. यासाठी आपण काही अँप्सची मदत घेऊ शकतो.

नाशिकची हिंद केसरी थाळी राज्यात प्रसिद्ध; आस्वाद घेण्यासाठी होते खवय्यांची गर्दी

माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने विकास होत आहे. रोज नवनवीन अँप्स आपल्या भेटीला येतात. यातील काही विशिष्ट मोबाईल अँप्स द्वारे नोटा ओळखणे आता सोप्पे झाले आहे. INR Fake Note Check Guide, Counterfeit Money Detector, Chkfake App यांचा वापर करून खऱ्या नोटा ओळखता येतात.

पोलीस भरतीमध्ये धावता धावता तरुणाचा मृत्यु! वयाच्या 26 व्या वर्षीच घेतला अखेरचा श्वास

1) Counterfeit Money Detector
हे अ‍ॅप फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील सर्व देशांच्या बनावट नोटा ओळखण्यासाठी खास बनवण्यात आले आहे. यामुळे यामध्ये तुम्हाला तुमचा देश निवडावा लागेल. भारताचे चलन निवडताच तुम्हाला यावर खऱ्या-खोट्या नोटा ओळखता येतील.

“…म्हणून अमित शाहांनी कसबा चिंचवड मध्ये प्रचार केला नाही; रोहित पवारांचे ‘ते’ ट्विट चर्चेत

2) INR Fake Note Check Guide
सामान्य लोकांना बनावट नोटांपासून जागरूक करण्यसाठी हे अँप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या अँप द्वारे नोटिफिकेशन्सच्या माध्यमातून बनावट आणि खऱ्या नोटांमधील फरकाची माहिती दिली जाते.

3) Chkfake App
या अ‍ॅपमध्ये नोटेचा फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्या नोटेविषयी सर्व माहिती शोधून दिली जाते. अगदी कोणत्याही नोटेची माहिती या अ‍ॅपमधून मिळू शकते, त्यामुळे बनावट आणि खऱ्या नोटांमधील फरक समजण्यास मदत होते. महत्त्वाची बाब म्हणजे हे अ‍ॅप IOS आणि Android दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे.

शिवजन्मोत्सव: ‘परी’चा नववारी भरजरी अंदाज, मायरा वायकुळचे लेटेस्ट फोटो पाहिले का?

Spread the love
Exit mobile version