अनेक लोक आवडीने कुत्रा व मांजर पाळतात. आपलं प्राणीप्रेम जपण्यासाठी ते कुत्र्याची उत्तम प्रकारे देखभाल व लाड करतात. परंतु, हौसेपोटी कुत्रा आणि मांजर ( Dog & cat ) पाळणे आता तितके सोयीचे राहिले नाही. कारण, नोएडा ( Noeda) मध्ये पाळीव आणि भटक्या प्राण्यांबाबत अनेक कठोर निर्णय घेण्यात आलेले आहेत. इतकंच नाही तर पाळीव प्राण्यांच्या मालकांबद्दल सुद्धा यावेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
देशात 2000 च्या नोटांचा तुटवडा; 2019 पासून छापली नाही एकही नोट!
नोएडा मध्ये सार्वजनिक ठिकाणी पाळीव कुत्र्यांमुळे झालेली घाण साफ करण्याचे काम कुत्र्याच्या मालकाला करावे लागणार आहे. तसेच या प्राण्यामुळे कुठलाही गैर प्रकार घडल्यास पाळीव प्राण्याच्या मालकाला तब्बल दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. याशिवाय जखमी व्यक्तीच्या उपचाराचा खर्च देखील मालकालाच करावा लागणार आहे.
पतंजलीला मोठा झटका; या ५ औषधांवर आली बंदी
नोएडा प्राधिकरणाने पाळीव कुत्रे आणि मांजरांची नोएडा प्राधिकरण पेट अँप वर नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. ही नोंदणी न केल्यास मालकाकडून मोठा दंड आकारण्यात येणार आहे. येथे पाळीव कुत्र्यांचे नसबंदी आणि अँटीरेबीज लसीकरण देखील अनिवार्य केले आहे. याशिवाय भटक्या कुत्री आणि मांजरींसाठी नोएडा मध्ये आश्रयस्थान बांधले जाणार आहेत.
इंस्टाग्राम रिल्स मधूम ‘असे’ कमवा पैसे! मेटा कडून नवीन प्रोग्राम जाहीर