मुंबई : शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Adity thakreay) यांच्यावर पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील (gulabrav patil) यांनी टीका केली होती. दरम्यान या टीकेवर पलटवार करताना गुलाबराव पाटलांचा गळा दाबीन, अशी टीका औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांनी केली आहे. जे काय व्हायचं ते होईल, पण गुलाबराव यांना माफी मागायला लावीन, असा इशारा खैरे यांनी दिला आहे.
या टीकांना सुरुवात झाली ती इथून की, शिवसेना ही उद्धव ठाकरेंची (udhav Thakarey) की शिंदे गटाची. यावर आदित्य ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा असे आव्हान केले होते. तसेच शिंदे गटावर सातत्याने गद्दार असल्याची टीका आदित्य ठाकरेंकडून आणि उद्धव ठाकरेंकडून करण्यात येते आहे. म्हणून गुलबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.
काय म्हणाले होते गुलाबराव पाटील ?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार आदित्य ठाकरे होऊ शकतात, पण त्यांच्या विचारांचे वारसदार आदित्य ठाकरे होऊ शकत नाहीत. म्हणून त्यांनी बोलताना त्यांच्या वयाचा विचार करावा. तसेच आमच्या अनुभवाची विनाकारण खिल्ली उडवली तर आम्ही बोलण्यात कठीण आहोत,आण हे त्यांना आवरण अवघड होऊन जाईल, असा इशारा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
Suresh Raina: सुरेश रैनाने केली क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, कारण…
खैरे यांच्या इशाऱ्यावर गुलाबरावांचे उत्तर
या सगळ्या टीकांनंतर चंद्रकांत खैरे यांनी या प्रकरणी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली. त्यावर चंद्रकांत खैरे यांना आपला गळा का प्रिय आहे, असा टोला गुलाबराव पाटील यांनी मारला आहे. आपण जे म्हणालो ते खैरे यांनी नीट ऐकले तर ते आपल्याला गळ्याला लटकतील, गळाभेट घेतील असे प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.