मुंबई : अभिनेता आमिर खान (Aamir Khan) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. नुकतंच त्याचा बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झालाय. अमीर खानचा हा चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगला चालेल अशी आशा होती पण हा चित्रपट बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. या चित्रपटाने देशभरात म्हणावी तशी कामगिरी केली नाही. या चित्रपटादरम्यान आमिर खानने अनेक एक वक्तव्य केले होती. त्यानंतर आता त्याने त्याच्या सर्व चाहत्यांची माफी देखील मागितली आहे.
अमीर खानने एक ट्विट केले आहे. “आपण सर्व मानव आहोत आणि चुका या मानवाकडूनच होतात. कधी शब्दातून, कधी कृतीतून, कधी नकळत तर कधी रागात. कधी विनोदातून, कधीही न बोलून आपल्याकडून चुका होता. जर माझ्यामुळे तुमचे कोणाचेही हृदय कोणत्याही प्रकारे दुखावले गेले असेल तर मी मनाने, शब्दाने, शरीराने माफी मागतो. मिच्छमी दुक्कडम.” अस लिहीत अमीर खानने सर्वांची माफी मागितली आहे.
Abdul Sattar: कृषिमंत्री सत्तार मेळघाट दौऱ्यावर असतानाच शेतकऱ्याची आत्महत्या, कारण…
अमीर खानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. चाहते यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान आता नवीन माहितीनुसार, लाल सिंह चड्ढा यांचे डिजीटल अधिकार आता ५० कोटींना विकले गेले आहेत.