Site icon e लोकहित | Marathi News

मुलांनी हॉलिवूडचे चित्रपट पाहिले तर पालकांना कारागृहात डांबून ठेवण्यात येणार; किम जोंग उन चा मोठा निर्णय

If children watch Hollywood movies, parents will be put in jail; Big decision by Kim Jong Un

उत्तर कोरिया हा असा देश आहे ज्या देशामध्ये अजूनही हुकूमशाही चालत आहे. किम जोंग उन हे या देशाचे हुकूमशाह असून लोकांना त्यांच्या सर्व आदेशांचा मान ठेवावा लागत आहे. किम जोंग उन (Kim Jong Un) म्हणतील तेच खरं कारण त्यांच्याविरोधात बोलण्याची कोणाचीही हिंमत नाही. सध्या देखील त्यांनी एक आगळावेगळा नियम काढला आहे. त्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ

जर लहान किंवा तरुण मुलं हॉलिवूडचे चित्रपट आणि टीव्ही प्रोग्रॅम पाहताना दिसले तर त्यांच्या पालकांना कारागृहात डांबून ठेवण्याची शिक्षा मिळेल. तर मुलांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाश्चिमात्य माध्यमांचा प्रभाव कमी करण्यासाठी उत्तर कोरियाने हा मोठा निर्णय घेतल्याचं समजतंय.

‘त्या’ एका अहवालाने सगळा गेम बदलला; अदानी ठरले टॉप लुझर आणि एलन मस्क ठरले जगातील सर्वाधिक श्रीमंत

जे मुलं हॉलिवूड किंवा दक्षिण कोरियाचे चित्रपट (Hollywood or South Korean movies) पाहतील अशा मुलांना पाच वर्षांची शिक्षा मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या पालकांना देखील शिक्षा होणार आहे.

आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावले; अर्थसंकल्पीय अधिवेशनात घडला हा किस्सा

Spread the love
Exit mobile version