Ajit Pawar । अजित पवार (Ajit Pawar) यांनी 8 नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच पक्षाचे चिन्ह आणि पक्षावर आपलाच हक्क असल्याचा दावा त्यांनी केला. वर्षभरापूर्वी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारविरोधात बसलेले अजित पवार अचानकपणे सत्तेत सहभागी झाल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. (Latest Marathi News)
Chandrayaan-3 । आनंदाची बातमी! भारताचं सर्वात मोठं मिशन चंद्रयान-3 ‘या’ दिवशी होणार लाँच
दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी अजित पवार आणि भाजप (BJP) यांच्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 आणि विधानसभेच्या 288 जागा असून त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वात आगामी लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Elections) 13 आणि विधानसभेच्या निवडणुकीत (Vidhan Sabha Elections) 90 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुलाच्या कठड्याला धडकून बसचा भीषण अपघात; चालकासह १५ जण जखमी
एका आयोजित कार्यक्रमादरम्यान, अजित पवार यांनी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 90 जागा लढवेल आणि 71 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला होता. परंतु, त्यांनी केलेल्या बंडाचा आगामी निवडणुकीमध्ये काय परिणाम होतो का? हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.