Site icon e लोकहित | Marathi News

Boney Kapoor Sridevi Death । “श्री देवीचा नैसर्गिक मृत्यू नव्हता तर…” ५ वर्षांनंतर बोनी कपूरने सांगितलं धक्कादायक सत्य

"If it wasn't a natural death..." Boney Kapoor reveals the shocking truth after 5 years

Boney Kapoor Sridevi Death । बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीचे (Sridevi) 2018 साली निधन झाले. त्यामुळे कुटुंबासह श्रीदेवीच्या (Sridevi Death) चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. याप्रकरणी त्यांचे पती बोनी कपूर (Boney Kapoor) यांची 48 तास चौकशी झाली होती. श्रीदेवीच्या मृत्यूबाबत अनेक तर्क वितर्क लावले तरी आजही बोनी कपूर (Boney Kapoor) आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने याबाबत मौन बाळगले. (Latest Marathi News)

Buldhana News । खामगावात प्रकटले कथित गजानन महाराज, दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

बोनी कपूर यांनी प्रथमच एका मुलाखतीदरम्यान श्रीदेवीचा मृत्यू आणि चौकशीबद्दल (Boney Kapoor on Sridevi Death) खुलासा केला आहे. “श्रीदेवी क्रॅश डाएटवर (Crash diet) असल्याने ती बऱ्याचवेळा उपाशी राहत होती, कारण तिला सुंदर दिसायचे होते. आपण चांगल्या स्थितीत राहिलो तर ती ऑन-स्क्रीन चांगली दिसेल. ती मिठाशिवाय खूप कठीण डाएट फॉलो करत होती. त्यामुळे तिला चक्कर यायची,” असा खुलासा बोनी कपूर यांनी केला.

Amol Kolhe । काहीही झालं तरी पवार साहेबांची साथ सोडू नका, अमोल कोल्हेंना चिमुकल्याची भावनिक साद

“तो नैसर्गिक नाही तर तो अपघाती मृत्यू होता. याप्रकरणी माझी सतत चौकशी सुरु होती त्यामुळे मी याबद्दल न बोलण्याचा निर्णय घेतला होता. मी त्यावेळी जवळजवळ 48 तास याविषयी बोललो. चौकशीअंती त्यांना आढळले की तेव्हा काही चुकीचे घडले नाही. सर्व चाचण्या केल्यानंतर मृत्यू अपघाती होता असे अहवाल आला,” असे बोनी कपूर यांनी स्पष्ट केले.

Virat Kohli । वर्ल्ड कपपूर्वी किंग कोहलीचा धक्कादायक निर्णय, संघाची सोडली साथ

Spread the love
Exit mobile version